Wednesday, January 13, 2010

गंध

ओल्या मातीचा तो गंध
आज पहा रे सुटला
अंगणात माझा बाळ
आज पाण्यात न्हाहला
पावसाच्या त्या सरी
डबक्यात बरसल्या
चेहेरा माझ्या बाळाचा
चिखलाने माखालेला
चमकली आकाशात वीज
आघात झाला तो ढगला
माझा काळजाचा तुकडा
येऊन काळजाला चिकटला


Tanuja Pawar

 

No comments: