Saturday, June 7, 2008

तू....






आता तू जवळ हवा होतास मी पावसात भिजताना....
किती मजा आली असती सरीवर सरी झेलताना....
छोटे छोटे थेंब मी हातामध्ये साठवून तुझ्यावर फेकले असते..
तुझा हात हातात घेऊन चक्क पावसात नाचले असते..
तुझ्या बाइकवर् बसून आपण दूरवर हिंडलो असतो...
टोचणार्‍या पावसातही आपण मनसोक्त रमलो असतो ...
आता तू हवा होतास मस्त आल्याचा चहा पिताना,
किती मजा आली असती सरीवर सरी झेलताना....

किनार्‍यावर दूरवर आपण चालत गेलो असतो...
मग कुठल्यातरी खडकावर क्षणभर निवांत बसलो असतो...
येणार्‍या त्या लाटांना पाहून काही क्षण घाबरलो असतो..
मग एकमेकांना घट्ट पकडून लाटनाच पाहत बसलो असतो..
आता तू हवा होतास अफाट सागराला पाहाताना,
किती मजा आली असती सरीवर सरी झेलताना....

मोठा पाउस आला की धावत झाडाखाली गेलो असतो...
हिरव्या पानाच्या छत्रीखाली आसार्‍यासाठी थांबलो असतो..
एकमेकांच्या सहवासात आपण सगळ्यानाच विसरलो असतो..
मग घरी जाताना दोघही रुसून शांत झालो असतो...
आता तू हवा होतास मे एकटीच चालताना,
किती मजा आली असती तुझ्या बरोबर चालताना...

3 comments:

Unknown said...

Poignant?

Probably not. Probably the protagonist is enjoying the rains so much that she does not miss the addressee so much. Or probably she does. I'm not sure.

Anyways, a treat for the inner mind (especially the sense of touch for me, dunno why).

Mixed..Feelings said...

@ alok..
protagonist is enjoying rain coz she loves rain.. and she wants to share this experience wid the person she loves and she says that she will be more happy if he is there wid her....

Unknown said...

:)