दु:ख आणि सुख माझे तुझ्यातच गुंतलेले
दुष्काळ पडला की नदी शोधत राहते पाणी
तुझ्या शरीराची सावली शोधते मे अनवाणी
पावसाळ्यात रस्ता, भीक मागतो उन्हाचि
मन मागते माझे एक हाक प्रेमाची
विराहाच्या वादळामध्ये सुख माझे हरवलेले
गारव्यात सुर्या सुद्धा ओढतो शाल मेघांची
रात्री अन् दिवसा सुद्धा,मे पाहते तुझ्या येण्याची
ग्रीष्मात धरणीलाही, सावली मिळते झाडांची
केव्हा येईल घटीका आपल्या मिलनाची
वर्षानुवर्षे डोळे माझे वाटेवरच हरवलेले
दु:ख आणि सुख माझे तुझ्यातच गुंतलेले
Tanuja Pawar
1 comment:
Khooop sundar..
khup chaan bhavana wyakta kelya aahet tumhi :)
Post a Comment