Thursday, May 29, 2008

अस वाटत कधीतरी....

अस वाटत कधीतरी....
पावसाचे थेंब व्हावे
त्याच्या अंगावर पडून
त्याला चिंब करावे...
अस वाटत कधीतरी....
सूर्याचे किरण व्हावे
सकाळी सकाळी माझ्या स्पर्शानी
त्याला हळूच जागे करावे ....
अस वाटत कधीतरी....
वार्‍यात सामील व्हावे
आणि हळूच झुळकेबरोबर
त्याला जाऊन बिलगावे....
अस वाटत कधीतरी....
त्याच्याच रुमाल व्हावे
त्याच्याच हातानी त्याला स्पर्शून जावे....

3 comments:

S U J A Y S said...

Khoop chaan kavita ahey.Mazya athvani punnha jagya zalya ani atta tar chaan asa climate create hoat chalay.Hey pavsa purviche divas mala khup avadtat.ya divsat sandhya kalchya velela bikevar phirayla jam majya yete.moklya rastya chya donhi bajula hervigar zadi ani,mandd asa maticha sugandh.Pls mazya sathi ya climate war kavita karchil? Kasa vatla.

Mixed..Feelings said...

thanks

Anonymous said...

lovely poem